Student Scholarship: कॉलेजला जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती हव्यात या ५ सरकारी शिष्यवृत्ती

Anirudha Sankpal

पीएम युएसपी शिष्यवृत्ती

जे विद्यार्थी कॉलेज आणि विद्यापीठातील कोर्सेसमध्ये मेरिटमध्ये येतात त्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती आहे.

यासाठीचा अर्ज तुम्ही नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरून करू शकता.

PM YASASVI

पीएम यशस्वी (YASASVI) शिष्यवृत्ती ही ओबीसी ईबीसी आणि डीएनटी (डी नोटिफाईड ट्राईब) विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी देण्यात येते.

SC विद्यार्थी शिष्यवृत्ती

शेड्युल क्लासमधील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी त्यांना आर्थिक पाठिंबा मिळावा म्हणून उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये ही शिष्यवृत्ती दिली जाते.

ST विद्यार्थी शिष्यवृत्ती

शेड्युल ट्राईबमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून पात्र एसटी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.

नॅशनल स्कॉलरशिप फोर पीजी स्टुडंट

जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्यएशनचं शिक्षण घेत आहेत आणि ते या स्कॉलरशिपसाठी पात्र आहेत त्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.

कुठं अर्ज करायचा?

सर्व केंद्रीय सरकारी शिष्यवृत्ती या नॅशलन स्कॉलरशिप पोर्टलवर उपलब्ध आहेत. पात्र विद्यार्थी तेथून यासाठी अर्ज करू शकतात.

एकापेक्षा जास्त शिष्यवृत्ती

विद्यार्थी काही स्कॉलरशिप्सना एनएसपीच्या सध्याच्या पात्रतेनुसार आणि स्कीमच्या नियामनुसार अर्ज करू शकतात. ही पात्रता तुमच्या मेरीट, श्रेणी, कोर्स संस्था आणि कौटुंबीक उत्पन्नाच्या निकशावर ठरते.

येथे क्लिक करा