Rahul Shelke
देशात महापालिकांचा खजिना किती मोठा आहे, हे आकड्यांवरून कळतं. बजेटच्या आधारावर भारतातील टॉप 10 श्रीमंत महापालिका पाहूया.
मुंबई महानगरपालिका (BMC) ही भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. 2025 -26 चं बजेट 74,427 कोटी इतकं प्रचंड आहे!
बेंगळुरू महापालिका (BBMP) दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2025-26 चं बजेट साधारण 19,930 कोटी आहे.
दिल्लीची महानगरपालिका (MCD) देखील मोठ्या बजेटमुळे चर्चेत असते. 2025-26 चं बजेट 16,530 कोटी आहे.
अहमदाबाद महापालिका (AMC) चौथ्या क्रमांकावर आहे. 2025-26चं बजेट 15,502 कोटी रुपये आहे.
कोलकाता महापालिका (KMC) चं FY25 बजेटही मोठं आहे. अंदाजे 15,166.5 कोटी रुपये आहे.
पुणे महापालिका (PMC) देशातील टॉप 10 बजेटमध्ये आहे. 2025-26 साठी बजेट 12,618 कोटी आहे.
हैदराबाद महापालिका (GHMC) चं बजेटही दमदार आहे. 2025-26 चं बजेट 11,460 कोटी आहे.
सुरत महापालिका (SMC) चा सुधारित बजेट 10,000 कोटींपेक्षा जास्त गेलाय. 2025-26 मध्येही मोठी वाढ दिसते.
Greater Chennai Corporation (2025-26) चं उत्पन्न 8,267 कोटी आणि खर्च 8,404.7 कोटी रुपये आहे.
तर GVMC, विशाखापट्टणम (2025-26) बजेट 4,762 कोटी रुपये आहे.