Namdev Gharal
सध्या महाराष्ट्रात मनपा निवडणूकीत काल दिवसभर निवडणूकीत बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्यावरुन राजकारण पेटले आहे
तर ही शाई म्हणजे लोकशाहीची निशाणी आहे. ही कशी तयार केली जाते, याचा इतिहास काय आहे, कोणत्या रसायनामुळे ही शाही नखावर टिकून राहते याचा इतिहास पाहू
या शाई निळसर काळी रंगाची असते, यातील मुख्य घटक हा सिल्वर नायट्रेट असतो शाई बोटावर लावली जाते ही शाई त्वचेवरील ओलावा आणि प्रथिनांशी रासायनिक अभिक्रिया करते
या अभिक्रियेमुळे सिल्व्हर क्लोराईड तयार होते, जे पाण्यात विरघळत नाही आणि त्वचेला घट्ट चिकटून राहते. प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर याचा रंग गडद होतो आणि तो डाग कायमस्वरूपी राहतो
तसेच या शाईमध्ये अल्कोहोल देखील असते, ज्यामुळे शाई लावल्याबरोबर जवळपास ४० सेंकदात वाळते. व बोटावर घट्ट चिकटून राहते
भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा १९६२ च्या केंद्र सरकारच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत या शाईचा वापर सुरू झाला
ही शाई 'नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडिया' (NPL) मधील शास्त्रज्ञांनी विकसित केली होती. नये बोगस मतदान रोखणे हा याचा मुख्य उद्देश आहे
विशेष म्हणजे ही शाई कोणीही उत्पादन करु शकत नाही या शाईचे उत्पादन करण्याचे एकमेव अधिकार कर्नाटक सरकारची कंपनी 'मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड' कडे आहेत
मतदानादिवशी ही शाई बोटावर लावल्यानंतर साधारणपणे २-३ आठवडे ही शाई त्वचेवर राहते. जशी तुमची जुनी त्वचा निघून नवीन त्वचा येते, तसा हा डाग फिका पडत जातो
जर शाई नखावर लागली असेल, तर नख पूर्णपणे वाढून कापले जाईपर्यंत तिचा अंश नखावर दिसत राहतो. तसेच साबण, डिटर्जंट, तेल याच्या वापराने लगेच निघत नाही
भारताची ही शाई इतकी विश्वसनीय आहे की, भारत जगभरातील ३० पेक्षा जास्त देशांना (उदा. कॅनडा, नेपाळ, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका) निवडणुकीसाठी या शाईची निर्यात करतो
मनपा निवडणूकीत शाई पुसली जाण्याच्या आरोपावर आयोगाने सांगितले आहे की, मार्कर पेनमध्ये वापरली जाणारी शाई सुद्धा 'मैसूर पेंट्स' कडूनच येते आणि त्यातही सिल्व्हर नायट्रेट असते