पुढारी डिजिटल टीम
भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला! २०२५ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवून पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले.
भारताची माजी कर्णधार मिताली राज या लिस्टमध्ये अव्वल स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे ₹४० ते ₹४५ कोटी इतकी आहे. निवृत्तीनंतरही त्या ब्रँड एंडोर्समेंट्स आणि क्रिकेट संबंधित कार्यक्रमांमधून मोठी कमाई करतात.
टीम इंडियाची उपकर्णधार आणि सर्वात लोकप्रिय चेहरा स्मृती मंधाना. त्यांची संपत्ती सुमारे ₹३२ ते ₹३४ कोटी आहे. WPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांना ₹३.४ कोटींमध्ये साइन केले.
त्या अनेक मोठ्या ब्रँड्सच्या अँबेसडर आहेत.
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांची नेट वर्थ सुमारे ₹२४ ते ₹२६ कोटी आहे.
त्यांना BCCI कडून वार्षिक ₹५० लाखांचे ग्रेड A कॉन्ट्रॅक्ट मिळाले. WPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून ₹१.८ कोटी आणि जाहिरातींतून मोठी कमाई करतात.
झूलन गोस्वामी यांची एकूण संपत्ती सुमारे ₹८ कोटी आहे.
केवळ २१ वर्षांची स्टार शेफाली वर्माची संपत्ती सुमारे ₹८ ते ₹११ कोटी आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून ₹२ कोटींची WPL डील मिळाली असून त्या CEAT टायर्स आणि बँक ऑफ बडोदा यांच्या ब्रँड अँबेसडर आहेत.
ऑलराऊंडर दीप्ती शर्मा यांची नेट वर्थ ₹८ कोटी आहे. त्यांना UP वॉरियर्सने WPL मध्ये ₹२.६ कोटींमध्ये साइन केले. त्या Puma आणि Thums Up सारख्या ब्रँड्सचे प्रमोशन करतात.
जेमिमा रोड्रिग्ज — ₹५ कोटी नेट वर्थ, WPL मध्ये ₹२.२ कोटी.
पूजा वस्त्राकर — ₹३ ते ₹५ कोटी, मुंबई इंडियन्सकडून ₹१.९ कोटी.
यास्तिका भाटिया — ₹१ कोटी, Sketchers इंडिया सोबत ब्रँड डील.
रेणुका ठाकूर — ₹८० लाख ते ₹१ कोटी, Adidas आणि Biba सोबत करार.
मिताली, स्मृती, हरमनप्रीतपासून ते शेफालीपर्यंत.. या खेळाडूंनी दाखवून दिलं की क्रिकेट आता फक्त पुरुषांचा खेळ राहिलेला नाही