Belly Fat : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काय आहे '1.5 : 1' नियम?

पुढारी वृत्तसेवा

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आहारामध्ये प्रोटीन (प्रथिने) आणि कार्ब्स (कर्बोदके) यांचे प्रमाण 1.5 : 1 ठेवण्याचा नियम सध्‍या चर्चेत आहे.

आहारात दर १ ग्रॅम कर्बोदकांमागे १.५ ग्रॅम प्रथिने घेण्याचे उद्दिष्ट ठेवा.

1.5:1 हा नियम पोषण तत्वांचे उत्तम संतुलन साधण्याचा एक मार्ग आहे.

पोटाची चरबी कमी होत असताना स्नायू टिकवून ठेवण्यास हा नियम महत्त्वपूर्ण ठरतो.

तुम्ही एका दिवसात १०० ग्रॅम कर्बोदके खात असाल, तर त्याच दिवशी १५० ग्रॅम प्रथिने खाण्याचा प्रयत्न करा.

आहारातील हे गुणोत्तर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास आणि चरबीचा साठा कमी करण्यास मदत करते.

चिकन, अंडी, मासे, टोफू किंवा डाळी यांसारख्या स्निग्धता कमी असलेल्या प्रथिन स्रोतांचा आहारात समावेश करा.

फळे, भाज्या, ओट्स आणि संपूर्ण धान्य यांसारखी आरोग्यदायी कर्बोदके निवडा.

पोटावरील चरबी करण्‍यासाठी आहाराबरोबरच नियमित व्यायामही आवश्‍यक आहे.

टीप : आहारामध्ये मोठे बदल करण्यापूर्वी नेहमी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

येथे क्‍लिक करा.