अविनाश सुतार
रंगारेड्डी (तेलंगणा) (प्रति व्यक्ती जीडीपी ₹ 11.46 लाख)
रंगारेड्डी जिल्हा आधुनिकता आणि पारंपरिकेतेचे मिश्रण आहे. अनंतगिरी टेकड्यांमधील निसर्गसौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते
गुरुग्राम, गुरगाव (हरियाणा) (₹ 9.05 लाख)
गुरुग्राम हे आलिशान मॉल्स, उत्कृष्ट रेस्टॉरंट्स आणि उंच इमारतींसाठी प्रसिद्ध आहे. कॉर्पोरेट वातावरणासोबतच सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान आकर्षणाचे केंद्र आहे
बेंगळुरू अर्बन (कर्नाटक) (₹ 8.93 लाख)
भारताचे “सिलिकॉन व्हॅली” म्हणून ओळखले जाणारे बेंगळुरू हे तंत्रज्ञान आणि हरित परिसराचे सुंदर मिश्रण आहे
गौतम बुद्ध नगर, नोएडा (उत्तर प्रदेश) (₹ 8.48 लाख)
हा जिल्हा आधुनिक पायाभूत सुविधांसह हिरवाईने नटलेला आणि संस्कृतीने समृद्ध असा आहे
सोलन (हिमाचल प्रदेश) (₹ 8.10 लाख)
सोलन हे शहर आपल्या निसर्गसौंदर्य, आल्हादायक हवामान आणि आध्यात्मिक शांततेसाठी प्रसिद्ध आहे. याला “भारताचे मशरूम शहर” असेही म्हटले जाते
उत्तर आणि दक्षिण गोवा (₹ 7.63 लाख)
उत्तर व दक्षिण गोवा हे जुळ्या जिल्ह्यांप्रमाणे आहेत, जे त्यांच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांमुळे, पार्टी संस्कृतीमुळे आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना कायम भुरळ घालते
सिक्कीम (गंगटोक, नामची, मंगन आणि ग्यालशिंग) (₹ 7.46 लाख)
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या सिक्कीममध्ये बर्फाच्छादित पर्वत, प्राचीन मठ आणि सुंदर होमस्टे पाहायला मिळतात
दक्षिण कन्नड मंगळुरू (कर्नाटक) (₹ 6.69 लाख)
मंगळुरू येथे सोनेरी किनारे, प्राचीन मंदिरे आणि समुद्रकिनाऱ्यावरील मसाल्यांचा सुगंध प्रवाशांना मोहवतो. येथे पोर्तुगीज, तुळू आणि कोंकणी संस्कृतींचे मिश्रण आढळते
मुंबई (महाराष्ट्र) (₹ 6.57 लाख)
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून बॉलिवूडचे केंद्रस्थान आहे. येथे वारसा आणि आधुनिकतेचे अद्भुत मिश्रण पाहायला मिळते
अहमदाबाद (गुजरात) (₹ 6.54 लाख)
अहमदाबाद हे भारताचे पहिले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज शहर आहे. येथे मुघल वास्तुकलेचे सौंदर्य आणि आधुनिक कला दालनांची झलक दिसते