Pet Parrot Ban | 'हे' ७ सुंदर पोपट घरी पाळता येत नाहीत

पुढारी वृत्तसेवा

पोपट हे त्यांच्या बुद्धिमत्ता, रंगीबेरंगी पिसे आणि आकर्षक स्वभावामुळे जगभर लोकप्रिय आहेत

काही देशांमध्ये विशिष्ट पोपट पाळण्यावर कडक बंदी आहे. कारण ते दुर्मिळ (अतिसंरक्षित) आहेत

पेस्क्वेटचा पोपट

न्यू गिनीच्या रेनफॉरेस्टमध्ये आढळणारा हा पोपट त्याच्या काळ्या व लाल पिसांमुळे “ड्रॅकुला पोपट” म्हणून ओळखला जातो. हा पोपटा पाळण्यास बंदी आहे

लिअरचा मकाव

हा गडद निळा मकाव ब्राझीलमधील एका लहान प्रदेशात आढळतो आणि अतिसंरक्षित (Endangered) प्रजातींमध्ये गणला जातो. या पोपटाचा व्यापार किंवा मालकी ठेवणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे

स्पिक्सचा मकाव

अॅनिमेटेड चित्रपट “Rio” मधील प्रसिद्ध निळा पोपट म्हणजेच स्पिक्सचा मकाव. ही प्रजाती सध्या अत्यंत संकटग्रस्त असून नैसर्गिक अधिवासात नामशेष झाली आहे

मंक पॅराकीट

हा पोपट आक्रमक (invasive) प्रजातींमध्ये गणला जातो. अमेरिकेच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागात त्यांना ठेवण्यास बंदी आहे

काकापो

न्यूझीलंडमधील हा पोपट रात्री सक्रिय (निशाचार) आणि उडू न शकणारा आहे. सध्या ३०० पेक्षा कमी काकापो उरले असून सर्व पक्षी सरकारी संरक्षणाखाली आहेत

केप पोपट

दक्षिण आफ्रिकेत आढळणाऱ्या या दुर्मिळ पोपटाचा अधिवास धोक्यात आला आहे. कायद्यांनुसार जंगली केप पोपट पकडणे किंवा विक्री करणे गुन्हा मानला जातो

आफ्रिकन ग्रे पोपट

हा पोपट अत्यंत हुशार आणि मानवासारखे हुबेहुब बोलू शकतो. त्यामुळे तो पाळीव पक्ष्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या पोपटांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंदी आहे

येथे क्लिक करा