Public Holidays : जगात सर्वाधिक सुट्ट्या कोणत्या देशात? भारताचा नंबर कितवा?
पुढारी वृत्तसेवा
'वर्ल्ड रिव्ह्यूअर'ने सर्वाधिक सार्वजनिक सुट्ट्या असणारे देश जाहीर केले आहेत. जगात सर्वाधिक सुट्ट्यांचा आनंद घेणाऱ्या १० देशांची माहिती घेवूया
या यादीत नेपाळने दुसरे स्थान पटकावले आहे. नेपाळमध्ये ३५ सार्वजनिक सुट्ट्या असतात. विजया दशमी (दसरा) आणि तिहार (दिवाळी) हे नेपाळमधील दोन प्रमुख सण आहेत.
इराणमध्ये सुट्ट्यांची मोठी यादी आहे. या देशात २६ सार्वजनिक सुट्ट्या आहेत. येथील राष्ट्रीय दिवस आधुनिक राजकीय इतिहासाशी जोडलेले आहेत.
म्यानमार या देशातही २६ सार्वजनिक सुट्ट्या आहेत. हा देश बौद्ध धार्मिक उत्सव (पौर्णिमेचे पगोडा दिवस, थिंग्यान नववर्षाचा जल महोत्सव) राष्ट्रीय समारंभांसह साजरे करतो.
श्रीलंकामध्ये एकूण २५ सार्वजनिक सुट्ट्या आहेत. श्रीलंका दीपावली, ईद आणि ख्रिसमस (नाताळ) यांसारखे अनेक सार्वजनिक सण साजरे करते.
मलेशियाच्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीत राज्य-स्तरीय सुट्ट्यांची भर पडते. येथे २४ सार्वजनिक सुट्ट्या असल्या तरी राज्यनिहाय सुट्ट्यांची संख्या अवलंबून असते.
फिजीच्या सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ख्रिश्चन, हिंदू आणि मुस्लिम सणांचा समावेश आहे. या देशात २३ सार्वजनिक सुट्ट्या आहेत.
बांगलादेशच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरमध्ये इस्लामिक सण, राष्ट्रीय दिवस आणि अल्पसंख्याक-धर्मीय सणांचे मिश्रण आहे. या देशात २२ सार्वजनिक सुट्ट्या आहेत.
लिकटेंस्टाईन एक लहान युरोपियन राज्य असूनही, २२ सार्वजनिक सुट्ट्या आहेत.
कंबोडिया २१ सार्वजनिक सुट्ट्या असून, या देशाच्या सुट्टीच्या यादीत महत्त्वाचे बौद्ध उत्सव आणि राष्ट्रीय समारंभ (ख्मेर नववर्ष, पचम बेन) यांचा समावेश आहे.
सर्वाधिक सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनासोबतच दिवाळी, ईद, ख्रिसमस (नाताळ) अशा अनेक ४२ सार्वजनिक सुट्ट्या मिळतात.
येथे क्लिक करा.