Walking In Figure-8 Pattern : चालण्याचा 'फिगर-8' पॅटर्न मेंदूला कसा लाभदायक ठरतो?
पुढारी वृत्तसेवा
चालणे हा निरोगी राहण्यासाठी सर्वोत्तम व्यायामापैकी एक मानला जातो.
शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यासाठी दररोज १० हजार पावले चालणे लाभदायक ठरल्याचे अनेक संशोधनात स्पष्ट झाले आहे.
दुर्लक्षित झालेली चालण्याची पद्धत 'फिगर-8' पॅटर्नचा थेट मेंदू संतुलनाशी संबंध असल्याचे नव्या अभ्यासांद्वारे स्पष्ट झाले आहे.
मानसशास्त्रज्ञ डेबोरा सनबेक यांनी १९८० च्या दशकात 'इन्फिनिटी वॉक' ची संकल्पना विकसित केली.
आठ आकाराची कल्पना करत चालणे म्हणजे 'फिगर-8' वॉकिंग होय.
इन्फिनिटी वॉकिंग तंत्र म्हणजे जणू मेंदूसाठीचा एक व्यायाम आहे. अभ्यासानुसार, इन्फिनिटी वॉकमुळे शरीराचे संतुलन सुधारते.
'आठ'च्या आकारात चालण्यासाठी मेंदूच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही गोलार्धांना समन्वय साधून काम करावे लागते.
अभ्यासानुसार, आपण 'आठ'च्या नमुन्यात चालतो, तेव्हा मेंदू एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये समन्वय साधतो.
'आठ'च्या आकारात चालताना दिशा बदलत राहावी लागते. यामुळे संतुलन राखण्यासाठी मेंदू आणि स्नायूंना एकत्र काम करावे लागते.
आठच्या आकाराची जमिनीवर चिन्ह काढत असल्याची कल्पना ५ ते १० मिनिटे सतत चाला.
दररोज काही मिनिटे 'आठ'च्या आकारात लयबद्ध आणि सजग हालचालींमध्ये मन गुंतल्याने भावनिक नियमन, तणाव कमी करण्यास मदत होते.
येथे क्लिक करा.