Toned Milk | टोन्ड दूध की नॉर्मल? वजन कमी करण्या करिता कोणतं दूध जास्त फायदेशीर?

पुढारी वृत्तसेवा

वजन कमी करताना दूधाबाबत संभ्रम
वजन घटवायचं ठरवल्यावर अनेक जण दूध पिणं बंद करतात. काहींना वाटतं की दूधामुळे वजन वाढतं, तर काहींना टोन्ड दूध पोषणद्रव्यांनी कमी वाटतं.

Yak Milk Health Benefits | Pudhari

टोन्ड दूध म्हणजे काय?
टोन्ड दूधामधील फॅटचं प्रमाण कमी केलं जातं. त्यामुळे यामध्ये कॅलरी कमी असतात, पण प्रोटीन, कॅल्शियमसारखी महत्त्वाची पोषकतत्त्वे टिकून राहतात.

Yak Milk Health Benefits | Pudhari

नॉर्मल (फुल क्रीम) दूध कसं असतं?
नॉर्मल दूध म्हणजे फुल क्रीम दूध. यामध्ये फॅट जास्त असतं, त्यामुळे कॅलरीही अधिक असतात. हे दूध हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त मानलं जातं.

Yak Milk Health Benefits | Pudhari

वजन कमी करताना कॅलरी महत्त्वाच्या
वेट लॉससाठी रोज घेतल्या जाणाऱ्या कॅलरी कमी असणं आवश्यक असतं. या दृष्टीने पाहिलं तर टोन्ड दूध अधिक फायदेशीर ठरू शकतं.

Weight Loss Tips | pudhari photo

टोन्ड दूध पोषणद्रव्यांनी कमी आहे का?
तज्ज्ञांच्या मते, टोन्ड दूधामध्ये फक्त फॅट कमी केलं जातं. कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स मात्र जवळपास तितक्याच प्रमाणात असतात.

Drink Milk at Night | pudhari

तज्ज्ञांनी दिलेला सल्ला
वजन कमी करायचं असल्यास टोन्ड दूध पिणं योग्य ठरू शकतं. यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि अतिरिक्त फॅटही वाढत नाही.

weight loss without gym | Canva

नॉर्मल दूध कधी योग्य ठरतं?
जर एखादी व्यक्ती खूप सडपातळ असेल, जास्त शारीरिक मेहनत करत असेल किंवा मुलं, गरोदर महिला असतील तर नॉर्मल दूध अधिक फायदेशीर ठरू शकतं.

Milk food rules | file photo

दूध कधी आणि कसं प्यावं?
वजन कमी करताना दूध मर्यादित प्रमाणात प्यावं. रात्री झोपण्याआधी कमी प्रमाणात टोन्ड दूध पिल्यास फायदा होऊ शकतो.

योग्य निवड ही शरीरावर अवलंबून
तज्ज्ञांच्या मते, वजन घटवण्यासाठी टोन्ड दूध अधिक उपयुक्त आहे. मात्र शरीराची गरज, वय आणि जीवनशैली पाहून दूधाची निवड करणं महत्त्वाचं आहे.

Fast Weight Loss Diet | Canva

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

butter refined oil
<strong>येते क्लिक करा</strong>