मोनिका क्षीरसागर
तोंडाची चव गेलीये? हिवाळ्यातील बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकला होऊन जिभेची चव गेली असेल, तर हे टोमॅटो सूप तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
आरोग्यासाठी गुणकारी टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
फक्त १५-२० मिनिटांत तयार होणारे हे सूप बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागते आणि ते चवीलाही अप्रतिम असते.
आजारी असताना जड अन्न खाण्यापेक्षा हे हलके-फुलके टोमॅटो सूप पोटाला आराम देते आणि ऊर्जाही पुरवते.
गरमागरम सूप प्यायल्याने खवखवणाऱ्या घशाला लगेच आराम मिळतो आणि सर्दीचा त्रास कमी होतो.
सूपमध्ये थोडे आले, लसूण आणि मिरी पूड घातल्यास त्याची चव तर वाढतेच, पण ते औषधीदेखील ठरते.
जर तुम्हाला हॉटेलसारखी चव हवी असेल, तर सर्व्ह करताना वरून थोडे फ्रेश क्रीम किंवा बटर नक्की घाला.
घरच्या घरी पौष्टिक आणि चविष्ट टोमॅटो सूप बनवा आणि थंडीच्या दिवसात गरमागरम आस्वाद घ्या.