अविनाश सुतार
चेहरा उजळवून टाकण्यासाठी आपण विविध कास्मेटिक्स वापरत असतो. परंतु, स्वयंपाक घरात नेहमी असणार टोमॅटो आपल्या त्वचेचे आरोग्य सुधारू शकतो
वाढत्या वयाबरोबर कोलेजन कमी झाल्याने त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. त्यामुळे रोज चेहऱ्यावर टोमॅटो लावल्यास त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते
निस्तेज त्वचा, डार्क सर्कल, सुरकुत्यावर उपाय म्हणून महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा चेहऱ्यावर टोमॅटो लावल्यास आश्चर्यकारक फायदे दिसून येतात
टोमॅटोमध्ये पदार्थाची चव बदलण्याचे गुणधर्म असले तरी त्वचेचे आरोग्य सुधारण्याचे देखील घटक असतात
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, ए, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट आणि सायट्रिक अॅसिड मुबलक असतात
अंघोळीपूर्वी एका टोमॅटोमध्ये चिमूटभर हळदी आणि मध मिक्स करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावून २ मिनिटे मसाज करा. ५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा
टोमॅटो, बेसन आणि दह्यापासून फेस पॅक तयार करून दोन मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा, त्वचेवरील काळपटपणा दूर होण्यास मदत होईल
तेलकट त्वचेवर टोमॅटोपासून बनवलेला फेसपॅक गुणकारी ठरतो. यातील घटक त्वचेतील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करतात
वारंवार पिंपल्सचा त्रास होत असेल, तर टोमॅटोमध्ये कोरफडीचा गर मिक्स करुन फेसपॅक तयार करून चेहऱ्यावर लावा