पुढारी वृत्तसेवा
सुगंध हा शब्द उच्चारला तरी मन प्रफुल्लित होते. परफ्यूमच्या जगात जेव्हा 'टोबॅको'चा उल्लेख होतो, तेव्हा त्याचा सिगारेट किंवा धूम्रपानाशी दुरूनही संबंध नसतो.
टोबॅको परफ्यूम हा तंबाखूच्या पानांच्या वासाची नक्कल (re-creation) असते. तो केमिकल कंपाऊंड्स + नैसर्गिक अर्क यांच्या मिश्रणातून तयार केला जातो.
अमेरिकेतील अनेक आदिवासी जमाती आध्यात्मिक विधींमध्ये टोबॅको सुंगधाचा याचा वापर करत असत. मात्र, सुगंधाच्या बाजारात वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक अर्कात निकोटीन किंवा इतर उत्तेजक द्रव्ये नसतात.
'टोबॅको' परफ्यूम हा सिगारेटच्या धुरापासून नाही, तर प्रक्रिया केलेली पाने, नैसर्गिक डिंक (Resins) आणि विविध अर्कांच्या मिश्रणातून तयार केला जातो. टोबॅको परफ्यूम म्हणजे तंबाखूचा जळका धूर नाही, तर तंबाखूच्या पानांचा उबदार, श्रीमंत, स्टायलिश सुगंध.
टोबॅको परफ्यूमचा गंध सुकलेले गवत, उबदार लाकूड आणि एका प्रकारच्या जुन्या गोडव्याशी साधर्म्य दर्शवणारा असतो.
परफ्यूमसाठी तंबाखूचा अर्क तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुकलेल्या आणि आंबवलेल्या पानांपासून विद्रावकांच्या मदतीने अर्क काढला जातो. या प्रक्रियेत 'व्हर्जिनिया' प्रकारच्या तंबाखूचा वापर सर्वाधिक होतो.
तंबाखूच्या अर्काचा वास हा केवळ कडू नसून तो अतिशय गुंतागुंतीचा असतो. यात उबदार आणि गोडवा असलेला लाकडी सुगंध, सुकलेले गवत, चहा, मध आणि फुलांचा सौम्य स्पर्श, चॉकलेट, लेदर (चामडे) आणि वाळलेल्या फळांच्या छटांचा समावेश असतो.
२००७ मध्ये सर्वप्रथम 'टोबॅको व्हॅनिला' नावाचा परफ्यूम बाजारात आणला. इथूनच खऱ्या अर्थाने टोबॅको सुगंधाची क्रेझ वाढली. यातुनच पुढे 'टॅबॅक रोझ'सारखे अनेक आधुनिक परफ्यूम्स तयार झाले.