पुढारी वृत्तसेवा
बाजारातून मिरच्या आणल्यानंतर त्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
धुवल्यानंतर कापडाने पुसून मिरच्या पूर्णपणे कोरड्या करून घ्या.
मिरच्या जास्त काळ टिकवण्यासाठी त्यांची देठं तोडून टाकणे ही सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे.
देठं काढल्यामुळे मिरच्या सडण्याची प्रक्रिया थांबते आणि त्या महिनाभर ताज्या राहतात.
एका एअरटाईट डब्यात खाली पेपर टॉवेल किंवा टिश्यू पेपर अंथरून ठेवा.
टिश्यू पेपरवर मिरच्या ठेवा आणि वरून पुन्हा एका टिश्यू पेपरने झाकून डबा बंद करा.
हा डबा फ्रीजमध्ये ठेवल्यास मिरच्या अजिबात खराब होणार नाहीत.
लक्षात ठेवा, मिरच्यांमध्ये ओलावा राहिला तर त्या लवकर सडतात, म्हणून त्या नेहमी कोरड्या डब्यात साठवा.