पुढारी वृत्तसेवा
कापलेल्या भाज्या हवेच्या संपर्कात आल्यावर लवकर खराब होतात, म्हणून त्या नेहमी एअरटाईट डब्यात ठेवा.
अर्धा कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवताना त्याला पातळ तेलाचा हात लावा किंवा प्लास्टिक रॅपमध्ये गुंडाळा.
लिंबू कापल्यानंतर उरलेला भाग ताज्या पाण्यात बुडवून ठेवल्यास तो वाळत नाही.
चिरलेल्या भाज्यांवर थोडे पाणी शिंपडा आणि त्यांना ओल्या सुती कापडात गुंडाळून ठेवा.
बटाटे किंवा रताळी कापली असतील, तर ती काळी पडू नयेत म्हणून थंड पाण्यात भिजवून ठेवा.
मिरच्यांचा देठ काढून ठेवल्यास त्या अधिक काळ टिकतात आणि सडत नाहीत.
भाज्या साठवण्यासाठी झिपलॉक बॅगचा वापर करा, ज्यामुळे त्यातील आर्द्रता टिकून राहते.
पालेभाज्या धुवून कोरड्या केल्यानंतरच पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवाव्यात.