पुढारी वृत्तसेवा
कारल्याची भाजी कडू लागते म्हणून खात नाही? मग या टिप्स नक्की वापरून पहा.
भाजी चिरल्यानंतर त्यावर थोडे मीठ लावून १५-२० मिनिटे बाजूला ठेवा.
मिठाच्या पाण्यामुळे कारल्याचा कडूपणा नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते.
कारल्याच्या फोडी थोडा वेळ दही किंवा चिंचेच्या पाण्यात भिजवून ठेवल्यास चव छान येते.
भाजी शिजवताना त्यात थोडा गूळ घातल्याने कडूपणा आणि गोडव्याचा मस्त समतोल साधला जातो.
फोडणीमध्ये दाण्याचा कूट किंवा तीळ घातल्याने भाजीला छान खमंगपणा येतो.
या सोप्या ट्रिक्स वापरल्यास लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ही भाजी आवडीने खातील.
आजच ही पद्धत ट्राय करा आणि तुमची नावडती भाजी करा 'सुपर टेस्टी'!