Tips and Tricks : या ट्रिक्सने तुम्ही With in a Second सुईमध्ये धागा टाकू शकता

अंजली राऊत

थोड्या प्रकाशात धागा टाकणे कठीण

जेव्हा थोडासा प्रकाश असतो किंवा धाग्याचा शेवट हा थोडासा बोथट झालेला असतो. अशावेळी सुईमध्ये धागा टाकणे खूपच कठीण होते

घरगुती युक्ती

शिवणकाम करताना बहुतेकदा सर्वात मोठे आव्हान म्हणजे सुईमध्ये धागा टाकणे तर काही सोप्या घरगुती युक्तीमुळे तुम्ही हे काम सेकंदात पूर्ण करु शकतात

धाग्याचा शेवट कापून घ्या

जर धाग्याचा शेवट तुटलेला असेल तर तो सरळ आणि पातळ करण्यासाठी थोडा कापून घ्या. नंतर, तुमच्या बोटाने थोडेसे पाणी किंवा लाळेने तो ओला करा, ओला धागा अधिक लवचिक असतो आणि सुईच्या छिद्रातून सहजपणे सरकतो.

पांढऱ्या कागदाचा करा उपयोग

जेव्हा सुई पांढऱ्या कागदावर किंवा कापडावर ठेवली जाते तेव्हा छिद्र अधिक स्पष्टपणे दिसते. त्यामुळे डोळ्यांना लक्ष केंद्रित करणे सोपे होते. हे विशेषतः कमी दृष्टी असलेल्यांसाठी फायदेशीर आहे

धागा स्थिर ठेवा

बऱ्याच वेळा सुई पकडून धागा आत घालण्याचा प्रयत्न करतात, पण जर तुम्ही सुई पकडून धाग्याचा शेवट स्थिर ठेवला आणि सुई थोडीशी पुढे सरकवली तर धागा सहजपणे आत जातो.

सुई थ्रेडर वापरा

आजकाल, "सुई थ्रेडर" नावाचे एक छोटे उपकरण सुद्धा बाजारात आले आहे, जे सुईमध्ये धागा टाकणे खूप सोपे करते. त्यात पातळ तारेचा एक लूप असतो, जो सुईच्या छिद्रामध्ये घातला जातो आणि धाग्यातून ओढला जातो. हे विशेषतः ज्येष्ठांसाठी किंवा कमी दृष्टी असलेल्यांसाठी फायदेशीर आहे

थोडासा संयम आणि योग्य पद्धत

या सोप्या टीप्सनुसार तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय सेकंदात सुईमध्ये धागा टाकू शकतात. त्यासाठी थोडासा संयम आणि योग्य पद्धत हे कठीण काम अगदी सहज सोपे करू शकते.

GK : तुम्हाला माहितेय का ? क्रिकेटचा बॉल कसा तयार केला जातो?
GK : तुम्हाला माहितेय का ? क्रिकेटचा बॉल कसा तयार केला जातो?