GK : तुम्हाला माहितेय का ? क्रिकेटचा बॉल कसा तयार केला जातो?

अंजली राऊत

क्रिकेटच्या सामन्यात पांढऱ्या रंगाचा तर टेस्ट क्रिकेटदरम्यान लाल रंगाचा लेदर बॉलचा उपयोग करण्यात येतो.

लाल रंगाचा लेदर बॉल (Red Leather ball) कसा तयार करण्यात येतो, हे आपण पाहूया

सगळ्यात आधी लाल रंगाच्या लेदरला विशिष्ट आकारात कापून घेतलं जातं. त्यानंतर लेदरच्या कापून घेतलेल्या भागाला छोट्या माशाच्या आकारात कापण्यात येतं

त्यानंतर माशाच्या आकारात कापून घेतलेल्या तुकड्यांना लाकडावर ठेवून धाग्याने शिवून घेतलं जाते

बॉलचा अर्धवर्तुळाकार भाग तयार करून घेतला जातो. त्यानंतर त्यामध्ये फेव्हिकॉल लावून त्याला यंत्राच्या सहाय्याने गोलाकार आकार देण्यात येतो.

बॉलच्या आत काहीतरी कठीण गोलाकार वस्तू टाकली जाते आणि बॉलच्या दोन्ही भागांना एकत्र जोडले जाते. अगदी शेवटी बॉलचा वरचा भाग पांढऱ्या धाग्याने शिवण्यात येतो.

तर हा लाल रंगाचा लेदर बॉल कसा तयार केला जातो हे एकदा तुम्हीसुद्धा https://www.instagram.com/reel/CyQTGZyvKPQ/? utm_source=ig_embed&ig_rid=0f7f0107-2caa-40c1-9944-2f8dd7d39d9b व्हिडीओतून बघाच... सोशल मीडियावर हा व्हिडीओ @yummybites_kt या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओत पांढऱ्या धाग्याने शिवून घेतल्यानंतर बॉलला पुन्हा एकदा मशीनमध्ये टाकण्यात आले आहे. त्यानंतर ब्रशने लिक्विड लावल्यानंतर बॉल चमकदार दिसतो

त्यानंतर बॉलला लाल रंगाच्या पाण्यात बुडवून घेतलं आहे आणि लाल रंगाचे लेदर बॉल विक्रीसाठी तयार आहेत.

अशाप्रकारे यंत्रांच्या मदतीने तसेच कामगारांच्या मेहनतीने क्रिकेट खेळातील हा खास बॉल तयार करण्यात येतो

Pista : पिस्ता खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम | canva
Pista : पिस्ता खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम