पुढारी वृत्तसेवा
चालताना टाईल्स मोजण्याची सवय
काही लोकांना चालताना एकाआड एक टाईल्सवर पाय ठेवण्याची किंवा रेषा टाळण्याची सवय असते, ज्याची त्यांना बऱ्याचदा जाणीवही नसते.
साध्या चालण्याचे मनोरंजक खेळात रूपांतर
फोटो 3) कॉरिडॉर किंवा रेल्वे स्टेशनवर चालताना हा एक छोटासा खेळ बनतो, ज्यामध्ये मेंदू स्वतःसाठी एक नियम तयार करतो.
मानवाची पॅटर्न शोधण्याची नैसर्गिक वृत्ती
मानवी मेंदूला प्रत्येक गोष्टीत प्रमाणबद्धता, सुव्यवस्था शोधायला आणि लहान आव्हाने पूर्ण करायला खूप आवडते.
२०१२ चा अभ्यासात काय आढळले?
२०१२ च्या एका अभ्यासानुसार, मानवी मन कोणतीही माहिती सहजपणे एका सुबक संरचनेत मांडण्यास प्राधान्य देते.
रंग मेंदूला फॉलो करण्यासाठी सोपी रचना
टाईल्सचे चौकोन आणि आलटून-पालटून येणारे रंग मेंदूला फॉलो करण्यासाठी एक सोपी रचना पुरवतात, ज्यामुळे चालणे मजेशीर बनते.
पायाखालाचे पॅर्टन आणि चालण्याचा अनुभव
२०२१ मधील 'वॉकिंग ऑन व्हिज्युअल इल्युजन्स' या अभ्यासानुसार, पायाखालचे पॅटर्न आपल्या चालण्याच्या अनुभवावर थेट प्रभाव टाकतात.
बालपणीच्या सवयींचा अभ्यास
२००२ मधील ३१ मुलांच्या अभ्यासात असे दिसून आले की, अशा सवयी या सामान्य बालविकासाचाच एक भाग असतात.
ही सवय व्यक्तिमत्त्वाबद्दल काय सांगते?
ही सवय असणे म्हणजे काही तुम्ही अधिक सर्जनशील किंवा संघटित आहात असे नाही, हा केवळ वेळ घालवण्याचा एक खेळकर मार्ग असू शकतो!
निरुपद्रवी सवय ते मानसिक आरोग्य
जोपर्यंत ही एक साधी निवड आहे, तोपर्यंत ती निरुपद्रवी आहे; पण यामुळे तीव्र चिंता किंवा त्रास होऊ लागल्यास मानसिक आरोग्याशी निगडीत आहे हे लक्षात ठेवा.