पुढारी वृत्तसेवा
आरोग्यदायी शरीरासाठी रोजच्या आहारात हिरव्या भाज्या, फळे आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे.
आहारतज्ज्ञांच्या मते, रोज ३० ग्रॅम फायबर घेतल्यास शरीराच्या मेटाबॉलिक प्रक्रियेत उत्तम बदल होतात.
नियमितपणे पुरेसे फायबर घेतल्यास २ ते ३ आठवड्यांतच बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते आणि पोट साफ राहण्यास मदत होते.
फायबरमुळे अन्नातील ग्लुकोज रक्तामध्ये हळूहळू मिसळते, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होते.
रोज फायबरच्या सेवनाने शरीरातील एलडीएल (LDL) म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलची पातळी सुमारे ३ ते ५ टक्क्यांनी कमी होऊ शकते.
फायबरयुक्त आहारामुळे पोट दीर्घकाळ भरलेले वाटते, ज्यामुळे वारंवार खाण्याची सवय सुटते आणि वजन नियंत्रणात राहते.
सलग ६ ते ८ आठवडे फायबर घेतल्यास आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे ऊर्जा आणि मुड उत्तम राहतो.
फायबरचे प्रमाण एकदम न वाढवता दर आठवड्याला ५ ग्रॅमने वाढवावे, जेणेकरून पोटाच्या समस्या उद्भवणार नाहीत.
फायबरयुक्त आहार घेताना शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका, अन्यथा बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.
टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.