Tiger Migrate : हिवाळ्याची चाहूल लागताच वाघांच्या नैसर्गिक स्थलांतरणाला सुरुवात

अंजली राऊत

जोडीदाराचा शोध

हिवाळा सुरु झाल्यावर वाघ हे जोडीदाराचा शोध आणि अधिवासाच्या शोधात बाहेर पडतात

पावसाळ्यानंतर अनुकूल परिस्थिती

हिवाळा हा वाघांच्या नैसर्गिक स्थलांतरणाचा काळ आहे. पावसाळा संपल्यानंतर शेतातील पिके थोडी मोठी होतात आणि स्थलांतरणासाठी वाघांना आधार मिळतो.

स्थलांतरणाचे असते वेळापत्रक

दिवसा मुक्काम आणि रात्री भ्रमंती असे वाघांचे स्थलांतरणाचे वेळापत्रक असते. उन्हाळ्यात सारे ओसाड असल्याने या काळात वाघ स्थलांतर करत नाहीत. पावसाळा संपल्यानंतर साधारणत: सप्टेंबरमध्ये त्यांच्या स्थलांतरणाला सुरुवात होते.

स्थलांतरणाचा उत्तम काळ

पावसाळा संपल्यानंतरचा ऋतू हा वाघांच्या स्थलांतरणासाठी उत्तम काळ आहे. आठ ते दहा किलोमीटरपर्यंत जंगल नसतानाही जोडीदाराच्या शोधाकरीता वाघ शेती, नदीनाले ओलांडून स्थलांतर करत असतात.

वाघांना त्यांचे 'शॉर्टकट्स' माहिती

वाघांना त्यांचे 'शॉर्टकट्स' माहिती असतात. 200 ते 600-700 मीटरपर्यंत नदीचे पात्र ओलांडून वाघ स्थलांतर करतात.

जगाला वेड लावणारा 'जय' वाघ

जगप्रसिद्ध रांगडा गडी 'जय' या वाघाने नागझिऱ्यातून स्थलांतर करताना गोसीखुर्दचा कालवा पार करत उमरेड-करहंडला अभयारण्यात स्थलांतरित झाला.

अनुकूल परिस्थितीमुळे स्थलांतर

हिवाळ्यात स्थलांतरणासाठी अनुकूल परिस्थिती म्हणजेच अन्न, पाणी आणि लपण्यासाठी जागा असल्याने वाघ स्थलांतर करत असल्याचे गोंदिया जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर यांनी सांगितले.

Tiger Mating Tigress | pudhari file photo
Tiger Mating Tigress: नर वाघ मादीच्या शोधात महाराष्ट्रातून पोहत तेलंगणात पोहचला