Tiger Mating Tigress: नर वाघ मादीच्या शोधात महाराष्ट्रातून पोहत तेलंगणात पोहचला

Anirudha Sankpal

मध्य भारतातील जंगलांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत वाघांचा प्रजननाचा काळ असतो. या काळात नर वाघ मादीच्या शोधात लांबचा प्रवास करतात.

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील कान्हारगाव वन्यजीव अभयारण्यातील एका नर वाघाने देखील असा लांबचा प्रवास केला.

या वाघानं प्राणहिता नदी पार करून तेलंगणातील कागजनगर वाघ कॉरिडॉरमध्ये प्रवेश केला.

या वाघाचे मुख्य उद्दिष्ट जोडीदाराचा शोध घेणे, ब्रीडिंग करून आपले तात्पुरते क्षेत्र (Territory) स्थापित करणे हा होता.

वाघाने तेलंगणामध्ये कर्जेल्ली रेंजमधील इट्याल पहाड वनक्षेत्राद्वारे प्रवेश केला.

कागजनगर विभागातील हे क्षेत्र नुकतेच रिस्टोअर करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी २,२०० एकर अतिक्रमित जमीन परत मिळवून वृक्षारोपण केले आहे.

हा वाघ सध्या ४०-५० किमी क्षेत्रात फिरत आहे आणि तो शेवटचा मंचेरियाल वनक्षेत्राजवळ दिसला होता.

अधिकारी कॅमेरा ट्रॅप (camera traps) आणि इतर पद्धती वापरून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

कागजनगरचे वन विकास अधिकारी प्रशांत सुखदेव यांच्या म्हणण्यानुसार, वाघ प्रामुख्याने या ऋतूमध्ये जोडीदार, अन्न आणि पाण्याच्या शोधात प्राणहिता नदी पार करतात.

येथे क्लिक करा