Tiger vs Lion|वाघ की सिंह : लढाईत कोण ठरेल विजेता?

Namdev Gharal

वाघ व सिंह हे दोन्हीही ‘बिग कॅट’, दोन्हीही आपापल्या जंगलाच राजे असतात. यांचे अस्तित्‍व म्हणजे समृद्ध जंगलाचे प्रतिक

रुबाबदारपणा, ताकद, हुकुमत याबाबतीत दे दोन्ही प्राणी जंगलातील इतर शिकारी प्राण्यांपेक्षा वेगळे असतात

आफ्रिकेतील देशांच्या मैदानामध्ये सिंहाचे राजेपण ठळक आहे. तर भारत व चिन सायबेरीया या आशियायी देशांच्या जंगलामध्ये वाघाचे राज्य चालते

समजा या तुल्यबळ शिकारी प्राण्यांमध्ये लढाई झाली तर कोण जंगलाच्या गादीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करेल?

या दोन्ही प्राण्यांचा विचार केला तर वाघ (Tiger) साधारणपणे सिंहापेक्षा मोठा आणि जड असतो.

बंगाल वाघ किंवा सायबेरियन वाघ यांचे वजन 220 ते 320 किलोपर्यंत असते. तर आफ्रिकन सिंहाचे वजन साधारण 180 ते 250 किलोपर्यंत असते.

स्वभावाचा विचार केला तर सिंहाचा स्वभाव हा राजेशाही, सामाजिक असतो तर वाघ हा एकल, सावध आणि आक्रमक शिकारी आहे

सिंह हा टीमवर्कने काम करतो तर वाघ एकटा शिकार करतो टीम असेल तर सिंह वरचढ असतो. पण एकटा असताना वाघाची ताकद सिंहापेक्षा वरचढ ठरते

सिंह गर्जना करतो ती खूप मोठी आणि प्रभावशाली असते तर वाघ डरकाळी फोडतो ती थोडी कमी आवाज असलेली पण तीक्ष्ण असते.

वाघाचे स्नायू हे अधिक मजबूत असतात व शरिरही लवचिक असते. तर सिंहाचे स्नायू हे वाघाच्या तुलनेत कमी ताकदीचे असतात

इतिहासात ज्यावेळी सिंह आणि वाघांची लढाई घडवण्यात आली (जुन्या काळी, सर्कस किंवा राजदरबारात), यामध्ये बहुतेक वेळी वाघाने सिंहावर विजय मिळवला.

एकंदरीत वाघ व सिंहाचा ताकद, लवचिकपणा, आक्रमपणा याचा अभ्यास केला तर वाघ शारीरिकदृष्ट्या अधिक शक्तिशाली मानला जातो.

जिराफासारखी लांब मान असलेले आकर्षक हरीण