Namdev Gharal
हे एक असे दुर्मिळ हरीण आहे की ज्याची मान ही जिराफासारखी लांब असते. यामुळेच याला जिराफ गझेल Giraffe Gazelle असे नाव देण्यात आले आहे.
याला Gerenuk (जेरनुक) असेही म्हणतात. हा गझेल कुळातील प्राणी असून हरणाचीच एक चपळ प्रजाती असते.
याची मान आणि पाय खूप लांब असतात. त्यामुळे तो झाडांच्या उंच फांद्यांवरील पाने सहज खाऊ शकतो
हा प्राणी मुख्यतः पूर्व आफ्रिकेत – म्हणजे केनिया, टांझानिया, इथिओपिया आणि सोमालिया या देशांमध्ये आढळतो.
हे शाकाहारी प्राणी आहेत. ते झाडांची पाने, कोवळ्या फांद्या, फुले ते बहुतेक वेळा मागच्या पायांवर उभे राहून झाडांच्या पानांपर्यंत पोहोचतात.
याचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे हे गझेल पाण्याशिवाय दीर्घकाळ जगू शकतो, कारण तो आवश्यक आर्द्रता आपल्या आहारातून घेतो.
या प्रजातीमध्ये फक्त नरांना शिंगे असतात. ती इंग्रजी S आकाराची आणि लांब असतात.
नराची उंची सुमारे ३ ते ३.५ फूट आणि मादीची थोडी कमी असते. वजन अंदाजे ३०–५० किलो असते.
हा एकमेव हरिण आहे जो मागच्या पायांवर उभा राहून झाडांची पाने खाते, ज्यामुळे तो इतर गझेलपेक्षा वेगळा दिसतो.
जिराफासारखी लांब मान, नाजूक शरीर, आणि झाडांच्या उंच पानांपर्यंत पोहोचण्याची कला यामुळे हा सुंदर आणि विशेष प्राणी आहे.