थायरॉईड असणाऱ्यांनी रोजच्या आहारात 'हे' ६ पदार्थ टाळाच

मोनिका क्षीरसागर

थायरॉईड विकाराने (Thyroid disorders) जगभरातील लाखो लोकांना ग्रासले आहे.

ज्यांना थायरॉईडची समस्या आहे त्यांच्यासाठी पांढरा ब्रेड (White Bread) खाणं चांगला पर्याय नाही.

बटाटा वेफर्स/चिप्स (Potato Chips) हा पटकन होणारा स्नॅक थायरॉईड आरोग्यासाठी दुहेरी धोका आहे.

शेंगदाणे (Peanuts) प्रथिनांनी समृद्ध असले तरी, त्यामध्ये गॉयट्रोजेन्स नावाचे नैसर्गिक संयुगे असतात जे थायरॉईड हार्मोन संश्लेषणात (synthesis) व्यत्यय आणू शकतात.

कोबी, ब्रोकोली आणि फ्लॉवर या भाज्या पोषक तत्वांनी भरलेल्या आहेत, परंतु थायरॉईडच्या रुग्णांनी त्या कच्च्या किंवा जास्त प्रमाणात खाल्ल्यास समस्या निर्माण होऊ शकते.

सकाळची एक कप कॉफी थायरॉईड हार्मोनचे शोषण कमी करते. तज्ञांच्या मते, औषध घेतल्यानंतर कॉफी पिण्यापूर्वी किमान ३०-४५ मिनिटे थांबावे.

सोया उत्पादनांमध्ये आयसोफ्लाव्होन (isoflavones) नावाचे संयुगे असतात, जे थायरॉईड हार्मोनचे उत्पादन दाबून ठेवू शकतात आणि सिंथेटिक थायरॉईड औषधांचे शोषण रोखू शकतात.

तुम्ही देखील थायरॉईड रुग्ण असाल तर नियमित आरोग्य तज्ज्ञ किंवा पोषणतज्ञांचा सल्ला घ्या.

येथे क्लिक करा...