Rahul Shelke
आपल्या घरात जुन्या नोटा, नाणी कुठेतरी ठेवलेली असतात. पण हीच जुनी 1 रुपयांची नोट आज तुम्हाला मोठी रक्कम मिळवून देऊ शकते.
1 रुपयाची नोट RBI नाही, तर थेट भारत सरकारकडून जारी केली जाते. म्हणूनच या नोटीवर RBI गव्हर्नरची सही नसते. हीच गोष्ट तिला ऐतिहासिकदृष्ट्या वेगळी बनवते.
जुनी चलनं म्हणजे फक्त पैसा नाही, तर इतिहासाचा एक भाग असतो. अनेक लोक अशा दुर्मिळ गोष्टींसाठी मोठी किंमत द्यायला तयार असतात.
1917 साली छापलेली राजा जॉर्ज पंचम यांचा फोटो असलेली 1 रुपयांची नोट
आज खूप लोकप्रिय आहे.
1 रुपयांची नोट 1926 मध्ये बंद झाली, 1940 मध्ये पुन्हा सुरू झाली, आणि 1994 मध्ये पुन्हा बंद, त्यामुळे जुन्या नोटा दुर्मिळ झाल्या.
फक्त जुनी आहे म्हणून प्रत्येक नोटेची किंमत जास्त नसते. नोटेची अवस्था, छपाई स्पष्ट आहे का, त्यावर डाग-फाटलेली आहेत का, हे सगळं महत्त्वाचं असतं.
नोट कोणत्या वर्षाची आहे, सीरियल नंबर स्पष्ट आहे का आणि नोट नीट आहे का, यावर किंमत ठरते.
आज ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या नोटा आणि नाणी विकता येतात. फोटो अपलोड करा, माहिती द्या. थेट खरेदीदार संपर्क करतात.
कदाचित तुमच्या घरात एखादी जुनी ₹1 ची नोट पडून असेल. तीच नोट खजिना ठरू शकते.
प्रत्येक नोट लाखो करोडो रुपये देईलच असं नाही. पण नोट चांगल्या अवस्थेत असेल, तर तिची किंमत नक्कीच मोठी असू शकते.
जुन्या नोटा व नाण्यांची किंमत ही त्यांची अवस्था, दुर्मिळता, मागणी आणि खरेदीदारावर अवलंबून असते. खरेदी-विक्री करताना काळजी घ्या आणि स्वतः तपासणी करा.
Child Marriage pudharinews 'या' देशात होतात सर्वात जास्त बालविवाह; भारताची स्थिती काय आहे?