Snake Man of India : द स्‍नेक मॅन ऑफ इंडिया

Namdev Gharal

30 वेळा सर्पदंर्श होऊनही हा माणूस अजूनही सापांना जीवदान देतो

वावा सुरेश असे या अवलियाचे नाव असून केरळची राजधानी थिरुवनंतपूरम येथे ते राहतात

मानवी वस्‍तीत आलेल्‍या सापांना पकडून त्‍यांना त्‍यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे हेच यांच्या जीवनाचे कार्य आहे.

गेल्या अनेक वर्षांमध्ये ५०,००० पेक्षा अधिक साप त्‍यांनी पकडले आहेत. विषेश म्हणजे हे सर्व काम ते विनामोबदला करतात.

कोणतीही सुरक्षा साधने किंवा साप पकडणारी हत्‍यारे न वापरता ते लिलया हाताने साप पकडतात

अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना, नागरिकांमध्ये सापांविषयी जागरूकता निर्माण करण्याचे कार्य करतात.

युट्यूबवर त्‍यांचे साप पकडतानाचे अनेक व्हिडीओ आहेत त्यांच्या धाडसी कार्यामुळे ते लोकप्रिय आहेत.

सापामध्ये विषेशता किंग कोब्रा या अतिविषारी व महाकाय सापांना त्‍यांनी अनेक वेळा रेस्‍क्यू केले आहे.

त्‍याचबरोबर त्यांनी पकडलेले साप मुख्यतः नाग, क्रेट, वाईपरसारखे अत्यंत विषारी असतात.

केरळ सरकारने त्यांच्या कामगिरीसाठी अनेकवेळा त्‍यांना पुरस्काराने गौरवले आहे.

ब्‍युटी विथ ब्‍लॅक ॲन्ड व्हाईट