अंजली राऊत
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे 350 वर्षांपूर्वी मराठी भाषेवर होणारा परकीय हल्ला यशस्वीपणे परतवला होता
महाराजांनी ओळखले होते की, भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून संस्कृती आणि स्वाभिमानाचे ते प्रतीक आहे
Image of Chhatrapati Shivaji Maharajशिवाजी महाराज यांच्या काळात मराठी भाषेवर 'यावनी' या परकीय भाषेचा प्रभाव वाढला होता
मराठी भाषेचे जतन करण्यासाठी महाराजांनी रघुनाथ पंत हनुमंते यांना पाचारण करुन 'यावनी' शब्दांना मराठी किंवा संस्कृत भाषेतील पर्यायी शब्द शोधण्याचे आदेश दिले
रघुनाथ पंत हनुमंते यांच्या प्रयत्नातून तब्बल 1400 शब्दांचा 'राजकोष' हा शब्दसंग्रह तयार करण्यात आला
'राजकोष' या शब्दसंग्रहात लेखनवर्ग, किल्ल्यांचा विभाग, शस्त्रविभाग अशा विभागांचा समावेश केला. यामध्ये उदाहरण असे की, 'तलवार' या परकीय शब्दाला मराठीत 'खड्ग' हा शब्द स्विकारण्यात आला.
शिवाजी महाराजांनी शब्दसंग्रहासोबतच सुंदर हस्ताक्षराला प्रेरणा दिली.
असं होतं शिवाजी महाराजांचं मोडी लिपीतील हस्ताक्षर..
सुंदर हस्ताक्षरासाठी महाराजांनी बाळाजी आवजी चिटणीस यांना बोलावून त्यांच्याकडील 70 ते 80 प्रकारांच्या पत्रव्यवहारासाठी लागणारे पत्र मराठीत तयार करण्याचे आदेश दिले.
शिवाजी महाराजांनी केलेला हा बदल मराठी भाषेच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण टप्पा ठरला
"माझे लोक, माझी भाषा", या विचाराने प्रेरीत होऊन महाराजांनी मराठी भाषेला प्रशासकीय आणि सांस्कृतिक स्तरावर सन्मान मिळवून देत मराठीला नव्या उंचीवर नेऊन ठेवले
भाषिक वादामुळे 'मराठी'च्या अस्मितेचा प्रश्न चर्चेत असताना शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला प्रेरणा देतो.