अंजली राऊत
श्रीरामांचे निवासस्थान बघण्यासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक आणि पर्यटक येथे भेट देतात
प्रभू राम चंद्राच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या नाशिकमध्ये श्री रामाचे अनेक पुरातन मंदिरे आहे
सीता मातेचे अपहरण लंकाधिपती रावणाने पंचवटी मधून केल्याचं पुराणामध्ये सांगितलं जातं
नाशिक शहरातील पंचवटी परिसरात श्रीराम यांनी वनवास काळात पत्नी सिता आणि भाऊ लक्ष्मणासोबत त्यांनी वास्तव्य केल्याचा रामायणात उल्लेख आहे.
14 वर्षाच्या वनवास काळात पंचवटीतील सीतागुंफा येथे असलेल्या शिवलिंगाची सिता माता शंकराची उपासना करायची.
नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात प्रभू रामचंद्र, सितामाता, श्रीलक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फूट उंचीच्या मुर्त्या आहेत. चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा मोठा उत्सव आयोजित करण्यात येतो.
नाशिक शहराला धार्मिकतेसोबतच निसर्गाचेही वरदान लाभले आहे