Pink Buffalo|थायलंडची 'लाखमोलाची' गुलाबी म्हैस! उन्हात जास्त वेळ ठेवता येत नाही

Namdev Gharal

आपण आजपर्यंत अनेक म्हशी पाहिलेल्या असतात, भारत हा दूध उत्‍पादक देश असल्यामुळे याठिकाणी म्हशींच्या अनेक प्रजाती दिसतात आज थायलंडमधील गुलाबी म्हैस पाहूया

या म्हशींना थायलंडमध्ये स्थानिक भाषेत 'क्वे पुएक' (Kway Pueak) किंवा पांढरी म्हैस म्हटले जाते. सामान्य म्हशींच्या तुलनेत या दिसायला पूर्णपणे वेगळ्या आणि अत्यंत दुर्मिळ असतात.

यांची त्वचा सूर्यप्रकाशाला अत्यंत संवेदनशील असते. त्यामुळे त्यांना जास्त वेळ कडक उन्हात ठेवता येत नाही. त्यांना थंड ठेवण्यासाठी चिखलात डुंबणे किंवा सतत अंगावर पाणी मारणे आवश्यक असते.

या म्हशींचा रंग नैसर्गिक रित्या गुलाबी नसून तो अल्बिनिझम (Albinism) या जनुकीय बदलामुळे असतो. यामुळे त्यांच्या शरीरातील मेलेनिन (रंगद्रव्य) कमी होऊन त्यांची त्वचा गुलाबी किंवा पांढरट दिसते.

पण या म्हशींची किंमत कोटींच्या घरात असते. नुकतीच 'को मुआंग फेत' (Ko Muang Phet) नावाची एक अवाढव्य गुलाबी म्हैस सुमारे १८ दशलक्ष बाथ (साधारण ४.१८ कोटी रुपये) ला विकली गेली

थायलंडमध्ये गुलाबी म्हैस पाळणे हे 'सौभाग्य' (Good Luck) आणि 'समृद्धी' चे लक्षण मानले जाते. अनेक श्रीमंत लोक आणि शेतकरी प्रतिष्ठा म्हणून या म्हशींचे संगोपन करतात.

यांची त्‍वचा नाजूक आणि फिकट गुलाबी रंगाची असते तसेच बऱ्याचदा निळसर किंवा हलक्या रंगाचे डोळे असतात. या म्हशी आकाराने मोठ्या आणि धष्टपुष्ट असतात.

यातील काही प्रसिद्ध म्हशींना त्यांच्या सौंदर्यामुळे थायलंडमधील चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्येही काम करण्याची संधी मिळाली आहे.

यापैकी काही म्हशींचे वजन सुमारे १,५०० किलो जाते. एका सामान्य म्हशीच्या वजनापेक्षा हे वजन कितीतरी पटीने जास्त आहे.

या म्हशीची उंची सुमारे ५ फूटापर्यंत असू शकते. तिच्या उंचीमुळे ती लांबूनच उठून दिसते

Spider Monkey | हे माकड आहे की स्पायडरमॅन?