Namdev Gharal
आफ्रिकेत एक अशा प्रकारचे माकड आढळते की ते झाडावरुन उड्या मारताने बघितले की स्पायडरमॅनची आठवण येते
या माकडाचे अनेक व्यवहार हे एखाद्या कोळ्या सारखेच असतात, जमिनीवर चालताना, झाडाला लटकताना तो स्पायडरसाखा वाटतो. यामुळेच त्याचे नाव स्पायडर मंकी असेच पडले आहे
वर्षावंनामध्ये आढळणारे हे माकड मध्य आणि दक्षिण अमेरिकन देशांमध्ये घनदाट जंगलातच आढळते
त्यांचे वजन साधारणपणे ६ ते ९ किलो असते. त्यांचे हात आणि पाय शरीराच्या तुलनेत खूप लांब असतात.
या माकडाची शेपटी 'प्रीहेन्साइल' (Prehensile) असते, म्हणजेच ती पाचव्या हातासारखे काम करते. ते शेपटीने झाडाच्या फांद्या पकडून लटकू शकतात
या शेपटीच्या जोरावर ते आपले पूर्ण शरिर झाडावर लटकून ठेवू शकतात, तसेच बॅलन्स साधने, शेंड्याकडील पाने, फळे तोडणे यावेळी ही शेपटी खूप उपयुक्त
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बहुतांश स्पायडर माकडांच्या हातांना अंगठा नसतो. यामुळे त्यांना झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर वेगाने झुलत जाणे सोपे होते.
ही माकडे जमिनीवर क्वचितच येतात. ते झाडांच्या सर्वात वरच्या थरात राहणे पसंत करतात.घनदाट जंगलात सर्वात वरच्या थरावरच आपले जीवन व्यतीत करतात.
ही माकडे प्रामुख्याने फलाहारी असतात. त्यांच्या आहारात ७०-८०% वाटा फळांचा असतो. याशिवाय ते कोवळी पाने, फुले आणि कधीकधी कीटकही खातात.
हे माकडे सामाजिक प्राणी असतात आणि साधारणपणे १५ ते ४० च्या गटात राहतात. रात्रीच्या वेळी ते छोट्या उप-गटांमध्ये विभागले जातात.