‘थायलंड बाम’ बनवा घरच्या घरी, सर्दी खोकला गायब होईल चुटकीसरशी!

पुढारी वृत्तसेवा

थायलंड बामच्या वापराने काही वेळ मदहोश होते असे म्हटले जाते याचा सर्दी, सायनसच्या त्रासावरही उपयोग होतो असा दावा केला जातो.

या बामच्या डबीमध्ये मलम नसतो तर एक पोटली असते व कापूस, पोटलीमध्ये स्ट्राँग फ्लेवरची हर्बल औषधे भरलेली असतात. ज्यांचा वास घेतला जातो. इनहेलर

यामध्ये मेन्थॉल, कापूर व काही चायनिज हर्ब असतात हे सर्व एका पोटलीत भरलेलेली असतात. झाकझा उघडून ती इनहेल केली जातात

पण सध्या थंडीने लोक हैराण झाले आहेत. प्रत्‍येक वयोगटातील व्यक्ति सर्दी, खोकला, घशाच्या दुखण्याने बेजार झाला आहे.

यावर रामबाण उपाय म्हणजे घरातीलच देशी वस्तूंपासून तयार करता येईल असा ‘थायलंड बाम’

यासाठी मुख्य पदार्थ लागेल भीमसेन कापूर हा कुठेही आर्युवेदीक, किंवा मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध होईल

यानंतर आपल्या किचनमधील दोन गोष्टी लवंग चार ते पाच व ओवा एक ते दीड चमचा

यासाठी एका सुती कापडावर भीमसेनी कापूर चुरा करुन घालायचा आहे त्‍यावर लंवग व ओवा पसरवायच्या वरुन परत थोडा भीमसेनी कापूर

यानंतर या कापडाची छोटी पोटली तयार करायची व रबरबँड किंवा दोऱ्याने घट्ट बांधायची

झाला तुमचा ‘थायलंड बाम’ तयार थोड्या थोड्या वेळाने याचा वास घ्यायचा तुमचा सर्दी खोकला बऱ्याच अंशी कमी होऊन जाईल.

Bee Hummingbird |हा पक्षी एवढा छोटा आहे की काडेपेटीतही बसू शकेल