Bee Hummingbird |हा पक्षी एवढा छोटा आहे की काडेपेटीतही बसू शकेल

Namdev Gharal

या छोट्या पक्ष्याचे नाव आहे बी हमींगबर्ड(Bee Hummingbird), हा जगातील पक्षी प्रजातीतील सर्वात छोटा पक्षी आहे, याच्या पंखाच्या फडफाडटावेळी मधमाशीसारखा आवाज येतो त्‍यामुळे याला हे नाव पडले

हा पक्षी फक्त क्युबा या कॅरेबियन देशातच आढळतो, याचा आकार केवळ 5 सेंटीमिटर एवढा तर वजन केवळ 4 ग्रॅम असते. म्हणजे भारतीय रुपयाच्या नाण्याएवढा

पण हा अगदी छोटा असून कारनामे मोठे आहेत. हा दिवसाला कमीतकमी 1500 फूलांचा रस शोषून घेतो.

या हंमिंगबर्डचे हृदय सेकंदाला 20 वेळा धडकते, त्‍यामुळे याला नेहमी एनर्जीची आवश्यकता आहे त्‍यामुळे तो नेहमी आहार घेत असतो

पण याला दिवसभर खावे लागते, दर 10 ते 15 मिनिटाला याला रस शोषून घ्यावा लागतो. अन्यथा याचा मृत्‍यू होऊ शकतो

याच्या खाण्याचा विचार केला तर हा दिवसभरात आपल्या शरिरापेक्षा 8 पट अधिक खात असतो, याचा मेटाबॉलिजम खूप फास्ट असतो

याचे अंडही खूप लहान असते, अगदी वाटाण्याच्या दाण्याएवढा घरटेही एखाद्या शिक्क्याएवढे लहान असते 1 इंच लांबी रुंदीचे