shreya kulkarni
टिटनेस हा क्लॉस्ट्रिडियम टेटानी नावाच्या जीवाणूमुळे होणारा अत्यंत गंभीर आणि जीवघेणा आजार आहे.
हा जीवाणू प्रामुख्याने माती, धूळ, शेण आणि जंग लागलेल्या धातूंच्या वस्तूंमध्ये आढळतो. जखमेद्वारे तो शरीरात प्रवेश करून स्नायूंवर परिणाम करणारे न्यूरोटॉक्सिन तयार करतो.
टिटनेसमुळे स्नायूंना कडकपणा, जबड्याला जकड येतो, श्वास घेणे कठीण होणे, शरीराला झटके बसणे यासारखी लक्षणे दिसतात.
जखमीनंतर ३ ते २१ दिवसांत लक्षणे दिसू लागतात, सर्वात सामान्य लक्षण म्हणजे जबडा जकडणे खांदा, मणक्याचा भाग, पाठीचा कणा व पोटात स्नायूंची आकडी जाणवते. शरीराचे तापमान वाढते, घाम येतो, श्वसनात अडचण निर्माण होते.
भारतात बालकांना DPT लसी 6, 10, 14 आठवडे आणि 5 व्या वर्षी बूस्टर डोस दिला जातो.
जखम झाली की ती लगेच धुऊन डॉक्टरांकडून टिटनेस इंजेक्शन घ्या. टिटनेसची लक्षणे गंभीर असतात आणि वेळेवर उपाय न केल्यास प्राणघातक ठरू शकते. लसीकरण हीच उत्तम सुरक्षा!