रणजित गायकवाड
कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचे महान फलंदाज ब्रायन लाराच्या नावावर आहे.
लाराने 2004 साली इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नाबाद 400 धावा करण्याची अतुलनीय कामगिरी केली होती.
या यादीत त्यांच्या नंतर कोणत्या कर्णधर खेळाडूंचा क्रमांक लागतो, याची माहिती अनेकांना नसेल.
श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत.
जयवर्धनेने 2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधार म्हणून खेळताना 374 धावांची अविस्मरणीय खेळी साकारली होती.
द. आफ्रिकेचे वियान मुल्डर यांच्या बाबतीत एक वेगळाच प्रसंग घडला आहे.
याच वर्षी जुलै महिन्यात झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून खेळताना त्याने नाबाद 367 धावा केल्या होत्या.
मात्र, लाराचा विक्रम मोडण्याऐवजी त्याने आश्चर्यकारकरित्या आपल्या संघाचा डाव घोषित केला.
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर यांनी 1998 साली पाकिस्तानविरुद्ध कर्णधारपदाला साजेशी नाबाद 334 धावांची खेळी केली होती.
ऑस्ट्रेलियन कर्णधाराची कसोटीतील ही आजवरची सर्वोच्च धावसंख्या आहे.
अनेक फलंदाज या धावसंख्येच्या जवळ पोहोचले, परंतु हा विक्रम मोडू शकले नाहीत. मार्क टेलर यांची गणना आजही ऑस्ट्रेलियाच्या महान खेळाडूंमध्ये केली जाते.
इंग्लंडचे माजी कर्णधार ग्रॅहम गूच यांनी 1990 साली भारताविरुद्ध खेळताना 333 धावांची मॅरेथॉन खेळी केली होती.