जो रुटमुळे सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विश्वविक्रम धोक्यात

रणजित गायकवाड

जो रूटने भारताविरुद्ध मालिकेत आणि त्यापूर्वीच्या सामन्यांमध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक ऐतिहासिक विक्रम नोंदवले आहेत.

रिकी पॉन्टिंग, राहुल द्रविड आणि जॅक कॅलिस यांना मागे टाकत तो आता कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक आहे.

त्याच्या सध्याच्या फॉर्म आणि वयाचा विचार करता, सचिन तेंडुलकरचा सर्वकालीन धावांचा विक्रम मोडण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.

मँचेस्टर कसोटीत या सामन्यात रूटने शतक ठोकले.

रुट हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे.

त्याने भारताविरुद्ध मँचेस्टर येथील चौथ्या कसोटी सामन्यात रिकी पॉन्टिंगला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला.

रूटच्या खात्यात 13,400* हून अधिक धावा जमा झाल्या आहेत

त्याने रिकी पॉन्टिंग (13,378) आणि जॅक कॅलिस (13,289) यांना मागे टाकले.

सचिन तेंडुलकर (15,921) हा एकमेव फलंदाज आता रूटच्या पुढे आहे.