Termite health hazards : घरातील लाकूड कुरतडणारी वाळवी आरोग्याचीही शत्रू

Asit Banage

वाळवी फक्त लाकडाचीच शत्रू नाही, तर ती तुमच्या आरोग्यासाठीही धोकादायक आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

वाळवी जेव्हा लाकूड कुरतडते, तेव्हा लाकडाचा बारीक भुसा आणि धूळ हवेत पसरते.

यासोबतच वाळवीची विष्ठा आणि तिच्या लाळेचे बारीक कणही हवेत मिसळतात. जेव्हा आपण या हवेत श्वास घेतो, तेव्हा हे बारीक कण थेट आपल्या फुफ्फुसात जातात.

यामुळे सतत खोकला, शिंका येणे आणि दम लागणे यासारखे त्रास होऊ शकतात.

वाळवी नेहमी अशा ठिकाणी वाढ़ते जिथे ओल किंवा दमटपणा असतो.

वाळवी राहिल्यामुळे संबंधित भागातील दमटपणा आणखी वाढतो, ज्यामुळे भिंतींवर आणि लाकडावर काळ्या रंगाची बुरशी जमा होऊ लागते.

ही बुरशी हवेत आपले अदृश्य कण सोडते. जेव्हा हे कण आपल्या शरीरात जातात, तेव्हा भयानक फंगल इन्फेक्शन आणि फुफ्फुसाचे गंभीर आजार निर्माण होऊ शकतात.

फुफ्फुसांच्या गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी घरातील ओलसरपणा आणि वाळवीवर नियंत्रण आवश्यक आहे.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...