स्वालिया न. शिकलगार
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे
तिच्या हळदी सोहळ्यातील काही सुंदर फोटो तिने शेअर केले आहेत
हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत
तिने हे फोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले असून यलो हार्ट इमोजी शेअर केले आहेत
तेजस्विनी लोणारी उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते
तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे
राजकीय क्षेत्रातील शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत तिने लग्नगाठ बांधलीय
दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले