स्वालिया न. शिकलगार
सामंथा रुथ प्रभूने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत
ज्यात ती काळ्या रंगाच्या हातमागावर विणलेल्या कांजीवरम सिल्क साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे
साडीवर सिल्व्हर आणि शॅम्पेन रंगातील नाजूक जरीकाम दिसत आहे
ही साडी Xiti Weaves ची असून ती स्टायलिश दिसते
तिने ब्लॅक स्लिव्हलेस ब्लाऊज, मिनिमल दागिने, कुंदन ईअररिंगेज, बांगड्या, कानसाखळी घातली होती
या विणकामाची सुरुवात तामिळनाडूच्या कांचीपुरम शहरातून झाली
स्त्रिया या साड्या लग्न, धार्मिक समारंभांसाठी नेसतात
कांजीवरम विणकाम हे टिकाऊ आकर्षक दिसते