Tea Strainer Tips | चहा गाळताना करता ही चूक? आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

चहा बनविल्यानंतर तो गाळण्यासाठी आपण घरात प्रामुख्याने प्लॅस्टिक, स्टील किंवा कधीकधी कापडी गाळणी वापरतो

मात्र, आरोग्याच्या दृष्टीने स्टेनलेस स्टीलची गाळणी ही प्लॅस्टिकपेक्षा अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी मानली जाते

गरम चहा थेट प्लॅस्टिकच्या संपर्कात आल्यावर विशेषतः कमी दर्जाच्या प्लॅस्टिकमध्ये असलेले घटक उष्णतेमुळे चहात मिसळू शकतात

प्लॅस्टिक गाळणीमुळे मायक्रोप्लॅस्टिक शरीरात जाण्याची शक्यता, हार्मोन्सच्या कार्यावर परिणाम, पचन आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता

स्टेनलेस स्टीलची गाळणी उष्णता सहन करू शकते आणि त्यातून हानिकारक रसायने बाहेर पडत नाहीत

स्टील गाळणी गरम चहासाठी सुरक्षित मानली जाते, कारण ती टिकाऊ आणि दीर्घकाळ वापरता येते, स्वच्छ करणे सोपे असून गंज कमी लागतो

फूड-ग्रेड स्टेनलेस स्टीलची गाळणी वापरावी, खूप स्वस्त आणि हलक्या दर्जाच्या गाळण्या टाळाव्यात. जाळी तुटलेली किंवा गंजलेली असल्यास लगेच बदलावी

कापडी गाळणी नैसर्गिक असली तरी योग्य स्वच्छता न ठेवल्यास जंतू वाढू शकतात. त्यामुळे नियमित धुणे आणि वाळवणे आवश्यक असते

आरोग्याच्या दृष्टीने पाहता, प्लॅस्टिकपेक्षा स्टेनलेस स्टीलची गाळणी अधिक सुरक्षित आणि उत्तम पर्याय आहे

येथे क्लिक करा