Tea Recipe Tips: चहा करताना आधी दूध टाकावं की पाणी? एक चूक टेस्टच बदलून टाकेल

Anirudha Sankpal

पहिला चहा

आपल्या देशात चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही, पण ढाब्यासारखी चव घरात येत नाही.

एकत्र उकळू नका

अनेकजण चहा करताना दूध आणि पाणी एकत्र उकळतात, ज्यामुळे चहाची चव बिघडते.

सर्वात आधी काय करावं?

कडक चहासाठी सर्वात आधी चहाच्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे.

चहा पूड

पाण्यात चहा पूड, आले किंवा वेलदोडे पूड घालून पाणी चांगले उकळून घ्यावे, यामुळे मसाल्यांचा अर्क त्यात उतरतो.

दूध घालण्याची योग्य वेळ

मसाल्यांचा काढा तयार झाल्यावर शेवटी त्यात ताजे दूध आणि चवीनुसार साखर टाकावी.

जास्त उकळू नये

दूध मिसळल्यानंतर चहा जास्त वेळ उकळू नये, अन्यथा चहाची चव कडवट होऊ शकते.

पाणी अन् दुधाचं प्रमाण

दोन कप परफेक्ट चहासाठी दीड कप पाणी आणि एक कप दूध वापरणे उत्तम ठरते.

चहा करण्याची योग्य आणि अचूक पद्धत फोलो केली तर चहा अधिक चवदार आणि सुवासिक होतो.

येथे क्लिक करा