Sikkim Sundari | आयुष्यात फक्त एकदाच फुलणारे हिमालयातील सुदंर फूल: 'सिक्कीम सुंदरी'!

Namdev Gharal

हिमालयाच्या तीव्र उतारावर एक फूल असे असते की जे आयुष्यात एकदाच उमलते व आपल्या बिया पसरवून सुकून जाते पाहूया या फूलाची वैशिष्ठ्ये,याला सिक्कमी सुंदरी असे म्हणतात तर याचे Noble Rhubarb असे इंग्रजी नाव आहे

हिमालयात सिक्कीम, भूतान, तिबेट आणि नेपाळच्या अति-उंच पर्वतीय प्रदेशात समुद्रसपाटीपासून ४,००० ते ४,८०० मीटर उंचीवर खडकाळ उतारांवर ही वनस्पती उगवते

ही वनस्पती आयुष्यात फक्त एकदाच फुलते. ७ ते ३० वर्षे जमिनीत ऊर्जेचा संचय केल्यानंतर उन्हाळ्यात (जून-जुलै दरम्यान) ती १ ते २ मीटर उंच मनोऱ्यासारखी बहरते, बिया तयार करते आणि त्यानंतर नष्ट होते.

आयुष्यभर फक्त एकादाच फूलण्यासाठी ही वनस्पती इतकी वर्षे वाट बघते व एकदम बहरते. तिचे हे वैशिष्टये पाहून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ही आर्श्चय व्यक्त केलो होते.

या फुलाची रचना एखाद्या बौध धार्मिकस्थळ असलेल्या पॅगोडासारखी असते. स्थानिक घरांमध्ये किंवा मठांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि संरक्षणाचे प्रतीक म्हणून वाळलेली फुले ठेवली जातात.

या वनस्पतीची फिकट पिवळी किंवा पांढरट पाने (Bracts) एकावर एक आच्छादल्यासारखी वाढतात. ज्यामुळे आत सूर्यप्रकाश शोषला जातो आणि आतील तापमान बाहेरील तापमानापेक्षा जास्त राहते.

या वनस्पतीच्या मुळांचा उपयोग तिबेटी वैद्यकशास्त्रात केला जातो. मुळांचा वापर पचनविकार, बद्धकोष्ठता, सूज आणि अंतर्गत जळजळ कमी करण्यासाठी रेचक म्हणून केला जातो.

याच्या फुलोऱ्याचे आतील कोवळे खोड (Stem) रसाळ आणि आंबट-गोड चवीचे असते. स्थानिक गुराखी किंवा गिर्यारोहक तहान आणि भूक शमवण्यासाठी ते कच्चे खातात.

काही भागांत याच्या देठांचा उपयोग स्थानिक पातळीवर चटणी किंवा आमटीसारख्या पदार्थांमध्ये आंबट चवीसाठी केला जातो.