पुढारी वृत्तसेवा
जेवणासोबत चहा-कॉफीची सवय?
अनेकांना जेवल्यानंतर लगेच गरम चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते, पण ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
लोहाच्या शोषणात अडथळा
चहा आणि कॉफीमध्ये 'टॅनिन' आणि 'कॅफिन' असते, ज्यामुळे अन्नातील लोह (Iron) शरीर नीट शोषून घेऊ शकत नाही.
ॲनिमियाचा धोका वाढतो
शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यामुळे सतत थकवा जाणवणे आणि ॲनिमियासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
पचनसंस्थेवर होतो परिणाम
जेवल्यानंतर लगेच कॅफिनचे सेवन केल्याने पचनक्रिया मंदावते आणि गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास वाढतो.
प्रथिनांच्या पचनात अडचण
चहामधील घटक अन्नातील प्रथिनांचे (Proteins) पचन करण्यात अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे शरीराला पोषण मिळत नाही.
हृदयविकाराचा धोका
जेवणापूर्वी किंवा नंतर लगेच कॉफी पिल्याने रक्तदाब (Blood Pressure) वाढण्याची शक्यता असते, जे हृदयासाठी चांगले नाही.
योग्य वेळ कोणती?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेवण आणि चहा-कॉफी यामध्ये किमान १ ते २ तासांचे अंतर असणे अत्यंत आवश्यक आहे.
आरोग्याची काळजी घ्या
जर तुम्हाला चहाचे शौकीन असाल, तर रिकाम्या पोटी किंवा भरल्या पोटी चहा पिणे टाळून 'हर्बल टी'चा पर्याय निवडा.