पुढारी वृत्तसेवा
चवीपेक्षा आरोग्यासाठी फायदेशीर
दुधी भोपळा ही केवळ एक भाजी नसून, आरोग्याचा मोठा खजिना आहे असे आहारतज्ज्ञ मानतात.
तरुण त्वचेसाठी रामबाण उपाय
चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचा सतेज ठेवण्यासाठी दुधी भोपळा गुणकारी ठरतो.
व्हिटॅमिन 'अ' चा समृद्ध स्रोत
यात 'बिटा कॅरोटिन'चे प्रमाण भरपूर असल्याने शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन 'अ' मिळते.
हृदयरोग्यांसाठी वरदान
शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याची क्षमता भोपळ्यात असल्याने तो हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
मेंदूला मिळतो आराम
भोपळ्यातील विशिष्ट खनिजांमुळे मेंदूच्या नसांना थंडावा मिळतो आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.
पचनक्रिया होते सुलभ
दुधी भोपळ्यातील फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या पोटाच्या तक्रारी दूर होतात.
रक्तातील साखर राहते नियंत्रणात
मधुमेहींसाठी दुधी भोपळा हा रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी एक उत्तम आहार आहे.
महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा
भोपळ्याच्या बियांमध्ये लोह आणि झिंक भरपूर असल्याने महिलांमधील लोहाची कमतरता भरून निघते.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
यातील अँटिऑक्सिडंट्स फ्री रेडिकल्सचा सामना करून शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.