Tea Break | चहा प्यायल्‍यावर तरतरी का येते?

Namdev Gharal

एक चुसकी चाय घेतल्‍यावर म्‍हणजे चहाच्या पहिल्‍याच घोटात असे काय होते की शरिराला तररती येते, असे काय असते की ज्‍यामुळे आपल्‍याला फ्रेश वाटू लागते

इंग्रजांनी आनलेला चहा आता आपल्‍या समाजातील एक संस्‍कृतीचा भाग झाला आहे. लोक सकाळ संध्याकाळी चहा तर घेतातच पण दिवसा व रात्रीही अनेक ठिकाणी चहा घेतला जातो

मुळात आपल्‍याकडे दूध घालून, मसाला साखरेमुळे खूप गोड घट्ट चहा घेतला जातो. मऊ ताबूंस रंगामुळे चहाचे एक वेगळेच आकर्षण दिसून येते घडते की फ्रेश वाटू लागते

पण चहाचा घोट हा तरतरी आणतो ते चहा पावडरमधील प्रमुख असलेल्‍या कॅफीन (Caffeine) आणि एल-थियानाइन (L-theanine) या घटकांमुळे

आपल्या मेंदूमध्ये दिवसभर 'अ‍ॅडेनोसाइन' नावाचे रसायन तयार होत असते. हे रसायन जेव्हा त्याच्या रिसीव्हर्सला (Receptors) जाऊन चिकटते, तेव्हा आपल्याला थकवा आणि झोप जाणवू लागते.

चहा घेतल्‍यानंतर त्‍यातील कॅफीनची रचना ही अ‍ॅडेनोसाइनसारखीच असते. त्यामुळे चहा प्यायल्यावर रक्‍तावाटे कॅफीन मेंदूत जाऊन अ‍ॅडेनोसाइनची जागा घेते

याचा परिणाम म्‍हणजे कॅफीन मुळे मेंदूला थकव्याचा संदेश मिळत नाही आणि आपल्याला ताजेतवाने वाटू लागते

दुसरी गोष्‍ट म्‍हणजे आपल्‍या मेंदूतील आनंदाचे हार्मोन असलेले डोपामाईन याची पातळी चहा प्यायल्‍यामुळे वाढते. यामुळेच चहा प्यायल्यावर मूड चांगला होतो.

कॉफीच्या तुलनेत चहामध्ये 'एल-थियानाइन' नावाचे अमिनो अ‍ॅसिड असते. हे मेंदूतील अल्फा लहरी (Alpha waves) वाढवते, ज्यामुळे मन शांत होते पण झोप येत नाही.

कॅफीनमुळे येणारी अस्वस्थता (Jitters) एल-थियानाइन कमी करते, ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारची 'शांत सतर्कता' जाणवते. या दोन्ही रसायनांचे कॉम्‍बीनेशन चहामध्ये असते