Naivedya Sheera :घरच्या घरी बनवा मऊ, खमंग-तुपाळ शिरा; नैवेद्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी

पुढारी वृत्तसेवा

साहित्य- रवा १ वाटी, साजूक तूप ३/४ वाटी, साखर, गरम दूध ३ वाट्या, काजू, बदाम, मनुके

१ लहान चमचा वेलची-जायफळ पूड, ६ केसर काड्या, १ तुळशीचे पान

कृती: १ लहान चमचा तूप गरम करून काजू, बदाम, मनुके मंद आचेवर तळा हलके सोनेरी तळा

तूपात रवा घालून मंद आचेवर सतत परतत राहा.

रव्याचा छान खमंग वास, रंग हलका सोनेरी होईपर्यंत भाजा.

त्यात ३ वाट्या गरम दूध घाला. दूध घालताना रवा सतत ढवळत राहा

दूध रव्यात शोषले गेले की कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर २ मिनिटे वाफ काढा

त्यात साखर, केसरयुक्त दूध, तळलेले ड्रायफ्रूट्स, वेलची-जायफळ पूड घाला

साखर वितळल्यानंतर कढईवर पुन्हा २ मिनिटांसाठी झाकण ठेवा.

गॅस बंद करून शिरा सर्व्ह करा, तुळशीचे पान ठेवून नैवेद्य दाखवा

How to Make Makhmali Puri|मखमली पुऱ्या बनवायच्या? पुरी होईल मऊ, फुगलेली अन् चविष्ट