How to Make Makhmali Puri|मखमली पुऱ्या बनवायच्या? पुरी होईल मऊ, फुगलेली अन् चविष्ट

पुढारी वृत्तसेवा

साहित्य: मैदा/गव्हाचे पीठ २ वाट्या, दुधाची मलाई ३ चमचे, कोमट दूध

पिठीसाखर १ छोटा चमचा, साजूक तूप १ चमचा, मीठ, तेल

कृती: परातीत मैदा, पिठीसाखर, मीठ, तूप, साय एकत्र करून चोळून घ्या

थोडे-थोडे कोमट दूध घालून थोडे घट्ट पीठ मळून घ्या

मळलेल्या पिठाला थोडा तुपाचा हात लावून २० मिनिटे झाकून ठेवा

पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून जाडसर पुऱ्या लाटा

कढईत चांगले गरम करा. मध्यम आचेवर पुऱ्या दोन्ही बाजूंनी तळून घ्या

हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. गरमागरम मखमली पुऱ्या तयार आहेत!

Eat Garlic Every Day: सलग ३० दिवस दररोज लसूण खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरात काय बदल होतात?