जगातील सर्वात रागीट प्राणी Tasmanian डेव्हील

Namdev Gharal

ऑस्ट्रेलियातील Tasmani या बेटावरच आढळणारा एक प्राणी आहे तस्मानियन डेव्हिल. हा खूपच रागीट, शक्तिशाली छोटा मांसाहारी प्राणी आहे.

याचे डेव्हिल म्हणजेच पिशाच्छ हे नाव याच्या आवाजावरुन पडले आहे. कारण याचा आवाज इतका तिक्ष्ण व भितीदायक असतो की जंगलातील प्राणी याच्या आवाजाने दचकतात

दुसरे वैशिष्टे म्हणजे अतिशय रागीट स्वभाव, हा प्राणी खूप रागीट असतो कोणत्‍याही प्राण्यावर हल्ला करण्यात मागेपूढे पाहत नाही. आपआपसात देखील खूप मोठ्याने हे प्राणी भांडत असतात

अतिशय मजबूत जबडे हे याची ओळख कारण हे खाण्यात कोणतेही नखरे करत नाहीत लहान सस्तन प्राणी, पक्षी, कीटकही हे खातात मृत प्राणी हाडांसहीत चावून खातात

याचा स्वभाव फारच आक्रमक असतो; भांडताना मोठमोठे आवाज, गुरगुरणे, किंचाळणे हे याचे वेशिष्टे तसेच खाण्याच्यावेळी यांची मोठी भांडणे सुरु असतात

आकाराच्या बाबतीत हा छोटाच असतो उंची साधारण 30 सेमी; वजन 7–14 किलो. धावताना 13–15 किमी वेगाने धावू शकतो.

याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याला प्रचंड भूक असते हा स्वतःच्या वजनाच्या जवळपास 40% मांस एका वेळी खाऊ शकतो

हा निशाचर प्राणी आहे रात्रभर शिकारीचा शोध घेत असतो तर दिवसा बिळात किंवा झाडाखाली लपून बसतो.

यांच्या पिल्लांची वाढ कांगारुसारखी पिशवीत (marsupial) होते; 20–30 दिवसांनी लहान पिल्ले जन्मतात.

Sultan Chicken | राजेशाही लूक असलेला सुलतान कोंबडा