Sultan Chicken | राजेशाही लूक असलेला सुलतान कोंबडा

पुढारी वृत्तसेवा

जगात सर्वप्रथम तुर्कस्तान (Turkey) मधील इस्तंबूल येथील टॉपकापी पॅलेसमध्ये या कोंबड्याची पैदास करण्यात आली.

या ब्रीडची पैदासच मुळी राजदरबारातील बागेत फिरण्यासाठी व शोभेसाठीची कोंबडी म्हणून केली जाते

सुलतान कोंबडी हा सर्वात सुंदर व दुर्मिळ कोंबडीच्या जातींपैकी एक मानला जातो याचे स्वरूप राजेशाही असल्यामुळेच याला हे सुलतान नाव दिले आहे.

या कोंबडीच्या डोक्यावर पांढऱ्या मऊ पिसांचा मुकुट दिसतो — हे त्याचे खास वैशिष्ट्य.

मिश्या आणि दाढी (Beard & Muffs) चेहऱ्यावर मऊ, घनदाट पिसे असल्याने त्‍याच्या चेहऱ्यावर मिश्या व दाढी असल्यासारखी वाटते

याचे पाय पिसांनी झाकलेले असतात बोटांवरही पिसे असतात. त्‍याचबरोबर पाच बोटं असतात हेही एक वेगळेपण.

बहुतेक Sultan हे अगदी पांढऱ्या रंगाचेच असतात काही ठिकाणी काळ काळ्या रंगात असतात यामधील नर वजन: 2–2.7 kg मादी वजन: 1.5–2 kg असते

अतिशय शांत, मवाळ, मैत्रीपूर्ण असल्यामुळे घरात ठेवण्यासाठी लोकप्रिय असते

अगदी नाजूक जात — पावसात व चिखलात लगेच पिसे मळतात. यामुळे याचे पालन करताना स्वच्छ, कोरडे वातावरण आवश्यक असते.

याची किंमतही जास्त असते एक पिल्लू 1500–4000 रुपयापर्यंत तर पूर्ण वाढ झालेले चिकन: 5000–10,000 असते.

जगातील सर्वात वेगवान पक्षी