Anirudha Sankpal
आकार आणि ओळख
टॅडिग्रेड हा जगातील अत्यंत वेगळा प्राणी असून, याला 'वॉटर बिअर' (Water Bear) असेही म्हणतात.
सूक्ष्म स्वरूप
हा प्राणी अगदी लहान म्हणजे अवघ्या १ मिलीमीटर आकाराचा असतो, ज्यामुळे तो उघड्या डोळ्यांनी दिसत नाही.
अमरत्व
या प्राण्याला मारणे जवळपास अशक्य आहे, कारण प्रतिकूल परिस्थितीतही हा सहसा मरत नाही.
कडाक्याची थंडी आणि उष्णता
याला उणे २७२ अंश सेल्सिअस एवढ्या तीव्र थंडीत किंवा १५० अंश सेल्सिअसच्या उकळत्या पाण्यात टाकले तरी हा जिवंत राहतो.
अवकाशातील टिकून राहण्याची क्षमता
याला अंतराळात १० दिवस विनाऑक्सिजन सोडले तरी हा तिथेही सहज तग धरू शकतो.
अतिनील आणि न्यूक्लियर रेडिएशनचा सामना
मानवाला एका सेकंदात मारणारे न्यूक्लियर बमचे रेडिएशन सुद्धा हा प्राणी सहज सहन करू शकतो.
स्वतःला संरक्षित करण्याची पद्धत
धोका जाणवल्यास हा प्राणी आपल्या शरीरातील ९५ टक्के पाणी काढून टाकून कडक दगडासारखा बनतो.
पुनर्जीवन
या सुप्तावस्थेतून बाहेर आल्यावर, कितीही वर्षांनंतरही योग्य पाणी मिळताच हा प्राणी पुन्हा जिवंत होतो.